जिल्ह्यात ३,६८,२५० रुपयांचा दंड वसूल
रत्नागिरी:- ‘थर्टी फर्स्ट’ च्या अनुषंगाने या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्हा पोलिस दलाकडून सक्त नजर ठेवण्यात आली होती. या काळात ५३० जणांवर दंडात्मक कारवाई करून ३,६८,२५० रुपयांचा दंड आकारला. आणि मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या दोन चालकांवर कारवाई करण्यात आली.
३१ डिसेंबर रोजी ‘थर्टी फर्स्ट’ आणि १ जानेवारीला ‘न्यू ईयर’ साजरे करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, पार्त्यांचे आयोजन केले जाते. या कालावधीत मद्याचा वापर भरपूर प्रमाणात होतो. मद्यप्राशन करून वेगाने वाहन चालविल्यामुळे अनेक जीवघेणे अपघात घडतात. या अनुषंगाने जिल्हा पोलिस दलाकडून सर्वत्र करडी नजर ठेवण्यात आली होती.









