रेल्वेच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

चिपळूण:- कोकण रेल्वेच्या धडकेने खेर्डी (ता. चिपळूण) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. २७) सकाळी सहा वाजता ही घटना घडली. शनिवारी सायंकाळी याबाबत चिपळूण पोलिसात नोंद करण्यात आली.

याबाबत चिपळूण पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, खेडर्डी दातेवाडी येथे ओंकार इरप्पा पाटील (वय १८) हा विजापूर तालुक्यातील तरुण आपल्या आई-वडिलांसह राहत होता. मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या गरीब रथ या रेल्वेची त्याला खेर्डी येथे ट्रॅकवर धडक बसली. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी चिपळूण पोलिसांना त्याची माहिती दिली. चिपळूण पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. कामथे रुग्णालयात पाटील याचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.