‘मनरेगा’ योजना; २२८५ हेक्टर क्षेत्रावर लागवड
रत्नागिरी:- कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गत सहा वर्षांत राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी १२ कोटी ८४ लाखांहून अधिक निधी खर्ची पडला आहे.
शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. गत सहा वर्षांत तालुक्यातील दीडशेहून अधिक गावांमधील २२८५.७५ हेक्टर क्षेत्रांवर आंबा, काजू, नारळ, चिकू, साग आदी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यासाठी ३५२८ मजुरांना ११ कोटी ८४ लाख १ हजार ८७९ रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला.
२०१८-१९ मध्ये ४३४.८० हेक्टर क्षेत्रांवर ६१९ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ८० लाख ४६ हजार २६ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०१९-२० मध्ये ७४९ मजुरांनी ५६१.९५ हेक्टर क्षेत्रांवर लागवड केली. यासाठी २ लाख २५ हजार ३३९ रुपये खर्ची पडले. २०२०-२१ मध्ये ३८१.४५ हेक्टर क्षेत्रांवर ६२९ लाभार्थी मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ७२ लाख ७४५ रुपये खर्ची पडले. २०२१-२२ मध्ये ५९५ मजुरांनी ३५६.२५ हेक्टर क्षेत्रांवर लागवड केली. यासाठी २ कोटी ८४ लाख ८७ हजार २३८ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०२२-२३ मध्ये २६०.७० हेक्टर क्षेत्रांवर ४२४ मजुरांनी लागवड केली. यासाठी १ कोटी ६९ लाख ८ हजार ८३६ रुपयांचा निधी खर्ची पडला. २०२३-२४ आर्थिक वर्षात २६ डिसेंबरअखेर ५१२ लाभार्थी मजुरांनी २९०.६० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी १ कोटी ४२ लाख ३३ हजार ६९५ रुपयांचा निधी खर्ची पडला.









