रत्नागिरी:-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज रात्री प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात एकूण 52 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1826 इतकी झाली आहे
जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. प्रत्येक तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरी 11,कळंबणी 9, कामथे 18,दापोली 5, गुहागर 9 येथील रुग्णांचा समावेश आहे









