रत्नागिरी:- शहर, तालुक्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे कोरोनाबाधित क्षेत्रांची संख्याही वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन कोरोना बाधित रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधीत करण्यात येतो. आज शहर व तालुक्यात नव्याने 9 कोरोना बाधित क्षेत्रांची भर पडली आहे.
आज झापडेकर चाळ, हिलटॉप अर्पाटमेंट, शिवाजीनगर, किर्तीनगर, गोडबोले स्टॉप, वैभवनगर अपार्टमेंट आंबेडकरवाडी, हॉटेल लँडमार्क जवळ थिबापॅलेस रोड, मौजे गणेशगुळे, शिंदेवाडी, मौजे नाचणे संभाजीनगर, टीआरपी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.









