मिरकरवाडा जेटीजवळ आढळला खलाशाचा मृतदेह

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा जेटीच्या पाण्यामध्ये खलाशाचा मृतदेह आढळून आला. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. यज्ञ बहादुर डंगोरा (३५, रा. नेपाळ, सध्या मिरकरवाडा, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसात करण्यात आली आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यज्ञ डंगोरा हा मिरकरवाडा येथे मच्छीमार बोटीवर खलाशी म्हणून कामाला होता. गुरुवारी तो कुणाला काही न सांगता अचानक बेपत्ता झाला होता. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास यज्ञ डंगोरा याचा मृतदेह मिरकरवाडा जेटीच्या पाण्यात दिसून आला. त्यानुसार या घटनेची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.