रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद खंडाळा येथे मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या मद्यपीवर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र रामचंद्र दिवेकर (रा. चाफेरी, गवळीवाडी, रत्नागिरी), कल्पेश सहदेव चौगुले (रा. चाफेरी गवीवाडी, ता. रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. ही घटना वाटद- खंडाळा येथील कोकणनगर व सैतवडे रस्त्यावर निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवेकर व चौगुले दारुच्या मद्यधुंद नशेत पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रसाद सोनावणे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.