रत्नागिरी:- तालुक्यातील तोणदे येथील तरुणाने अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विघ्नेश देवेंद्र भाटकर (२४, रा. तोणदे, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१) रात्री आठच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विघ्नेश याने १९ ऑगस्टला विषारी औषध प्राशन केले होते. त्याला उलट्या होऊ लागल्या. नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या उपचार सुरु असताना शनिवारी रात्री आठच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.