किल्ला पठाणवाडीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला दाखल करण्यावरुन तणाव

त्नागिरी:– रत्नागिरी शहरातील पठाणवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला आणायला गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना स्थानिक नागरिकांनी रोखले. रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्यावरून येथे प्रचंड तणाव झाला असून पोलीस यंत्रणेला पाचारण करण्यात आले आहे. 

रविवारी रात्री या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी या ठिकाणी गेले होते. मात्र आम्ही उद्या सकाळी आपणहून आणून सोडतो असे या रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले. सोमवारी सकाळी पुन्हा आरोग्य कर्मचारी गेले असता आम्ही रुग्णाला सिव्हील मध्ये पाठवणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे सांगत येथील नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना रोखून धरले. यामुळे शहर पोलिस स्थानकातून अधिक पोलीस कुमक मागवण्यात आली असून या पॉझिटिव्ह रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.