रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यात 25 जण कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. यात एका पोलिसासह एका वर्षाच्या लहानग्याला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एका सर्पमित्राला देखील कोरोना झाला आहे.
काही दिवसांपूर्वी शहर पोलीस स्थानकातील एका महिला कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर शहर पोलीस स्थानकातील सर्व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आणखी एका कर्मचाऱ्याला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
एका वर्षाचा मुलगा देखील पॉझिटिव्ह आला आहे. यासह गोल्डन पार्क माळनाका, पऱ्याची आळी, मिरकर वाडा, भगवतीबंदर, पावस, राजीवडा, सडये, गोळप, मारुती मंदिर, गयाळवाडी, आंबेशेत, आय टी आय ( क्वारंटाईन) , शहर पोलीस ठाणे, कर्ला येथे नवे रुग्ण सापडले आहेत.