रत्नागिरी:- जिल्ह्यातील पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी काढले आहेत.
संगमेश्वर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक स्मिता सुतार यांची सायबर पोलिस ठाणे येथे तर अमित यादव यांची संगमेश्वर पोलिस ठाणे येथे बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांची लांजा पोलिस ठाणे येथे बदली केली आहे. रत्नागिरी येथील पोलिस नियंत्रण कक्षातील निरीक्षक अतुल जाधव यांची देवरूख पोलिस ठाणे येथे तर नियंत्रण कक्ष येथील दुसरे पोलिस निरीक्षक राजेंद्र यादव यांची रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली झाली आहे तर मानव संसाधन शाखा रत्नागिरी येथील पोलिस निरीक्षक सुदाम माने यांची नियंत्रण कक्ष येथे पोलिस निरीक्षकपदी बदली केली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन ढेरे यांची बदली स्थानिक गुन्हे शाखेत झाली आहे.









