पावस येथून आईसह मुलगा बेपत्ता

40 दिवसानंतर पूर्णगड पोलिसांत तक्रार दाखल

रत्नागिरी:- तालुक्यातील पावस येथून आई व मुलगा बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रद्धा श्रीकांत पटवर्धन (49) व संकेत श्रीकांत पटवर्धन (27, रा पावस रत्नागिरी) अशी बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत 17 मे 2024 पासून हे दोघेही राहत्या घरातून बेपत्ता असल्याची तक्रार पूर्णगड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 17 मे रोजी श्रद्धा पटवर्धन यांच्या घरी कौटुंबिक वाद निर्माण झाला होता. या रागातून श्रद्धा व त्यांचा मुलगा संकेत हे सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास अचानक घरातून कोठे तरी निघून गेले, अशी तक्रार श्रद्धा यांचे पती श्रीकांत यशवंत पटवर्धन यांनी पुर्णगड पोलिसांत दिली त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे श्रद्धा व संकेत यांच्याविषयी कुणाला काही माहिती असल्यास पुर्णगड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस फौजदार एस व्ही चव्हाण यांनी केले आहे.