रत्नागिरी शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात फैलाव

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरासह संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात येवू लागले असून सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे. विविध ठिकाणी असणारा कचरा साचलेले पाणी यामुळे प्रामुख्याने डेंग्यूमध्ये वाढ होत आहे. रत्नागिरी शहरात येथील अस्वच्छता जागोजागी पडणारा कचरा, पाणीची डबकी, साचलेली गटारे यामुळे संपूर्ण जिल्ह्याबरोबरच शहरामध्येही मोठया प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण मिळू लागले असून नगर परिषदेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

फक्त रत्नागिरी शहरात 30 डेंग्यूचे रुग्ण सापडून आले आहेत. हे रुग्ण जिल्हा रुग्णालय तसेच नगर परिषदेच्या रुग्णालयामधून आढळून आले असून खाजरी रुग्णालयाकडे जाणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे. मात्र तो आकडा उपलब्ध झालेला नाही.

रत्नागिरी शहर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडले असून कोणीही या कुठेही कचरा टाका तसेच शहरातील विविध भागात तुंबलेली गटारे तसेच पशुपक्षांसाठी ठेवण्यात आलेल्या भांड्यांमधील पाणी स्वच्छ न केल्यामुळे डेंग्यूच्या डासामध्ये वाढ झाली आहे. यासाठी नागरीकांनी काळजी घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक अनिरुद्ध आठल्ये यांनी केले असून शिवाजी नगर येथे 6 रुग्ण डेंग्यूचे सापडून आले आहेत.

तर स्टेट बँक कॉलनी परटवणे, पोलीस मुख्यालय, राजीवडा, झाडगांव झोपडपट्टी, मारुती मंदिर, लाला कॉम्प्लेक्स, कोकणनगर, अभ्युदयनगर, माळनाका, परवर्धन हायस्कूल, निवखोल आणि साळवी स्टॉप या ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. तर अन्य भागातील खाजगी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहेत. रत्नागिरी गुहागर 5 रुग्ण, चिखली 1 रुग्ण, लांजा तालुक्यात शिपोशी आणि वाडीलिंबू आणि साटवली येथे 6 रुग्ण, लांजा तालुक्यात 6 रुग्ण गुहागरमध्ये 6 रुग्ण दापोलीमध्ये 1, संगमेश्‍वरमध्ये 4, रत्नागिरी शहरात 28, मालगुंड 4, कोतवडे 6, पावस12, चांदेराई 19, हातखंबा 12, धारतळे 8, अशी रुग्णांची संख्या असून 6 रुग्ण प्रथमदर्शनी दिसून आले आहेत. या सर्वांनी आणि सर्व जनतेने काळर्जीं घ्यावे, असे आवाहन जि. प. आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.