रत्नागिरी:- शेततळ्यामुळे शेतकर्यांना शाश्वत पाण्याची सोय उपलब्ध होते. परिणामी त्यांना शेती व्यवसायातून चांगली कमाई करता येत आहे. शेततळे खोदण्यासाठी कमाल 75 हजार आणि अस्तरीकरणासाठी कमाल 75 हजार असे एकूण दीड लाख रुपयांचे अनुदान शेतकर्यांना दिले जात आहे. महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर केवळ 23 रुपये 60 पैशांत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
शेतकर्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकर्यांना विविध बाबींसाठी अनुदान दिले जात आहे. विहिरीसाठी आणि शेततळ्यासाठी देखील अनुदान मिळते. शेतकर्यांना शेततळ्यासाठी तब्बल दीड लाख रुपयांचे अनुदान दिले जात आहे. योजनेत शेतकर्यांना 15 बाय 15 चे शेततळे खोदण्यासाठी 18 हजार 621 रुपये अनुदान मिळते तसेच अस्तरीकरणासाठी 28 हजार 275 रुपयांचे अनुदान मिळते. 20 बाय 15 चे शेततळे खोदण्यासाठी 26 हजार 674 रुपये आणि अस्तरीकरणासाठी 31 हजार 598 रुपये अनुदान मिळते.
20 बाय 20 चे शेततळे खोदण्यासाठी 38 हजार 417 रुपये आणि अस्तरीकरणासाठी 41,218 रुपयांचे अनुदान मिळते. 25 बाय 20 चे शेततळे खोदण्यासाठी 50 हजार 61 रुपयाचे अनुदान मिळते. 25 बाय 25 चे शेततळे खोदण्यासाठी 65,194 रुपयांचे अनुदान मिळते.20 बाय 25 चे शेततळे खोदण्यासाठी 75 हजार रुपयांचे अनुदान मिळते. 30 बाय 30 चे शेततळे खोदण्यासाठी 75 हजार रुपयांचे आणि अस्तरीकरणासाठी 75 हजार रुपयांचे असे दीड लाख रुपयांचे अनुदान मिळणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.