साळवी स्टॉप येथे गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत २७५ रुपयांची पाच लिटर दारु जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहबाज शब्बीर गावखडकर (वय २७, रा. साळवी स्टॉप, झोपडपट्टी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २५) दुपारी साडेचारच्या सुमारास साळवी स्टॉप झोपडपट्टी येथे निदर्शनास आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयिताकडे २७५ रुपयांची पाच लिटर दारु विक्रीसाठी ठेवलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.