रत्नागिरीतील वातावरण बदलले; साथीच्या आजाराने रुग्ण दहा टक्क्यांनी वाढले

रत्नागिरी:- गेले अनेक दिवस बदललेल्या वातावरणाने नागरिकांतून आरोग्याच्या तक्ररीत वाढ झाली आहे. खासगी व सार्वजनिक रुगालयामध्ये ताप, अंगदुखी, सर्दी, खोकला तसेच पोटदुखीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. गेल्या महिन्याच्या तुलनेत या दिवसांमध्ये दहा टक्क्यांनी रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदवले आहे.

त्वचारोगाच्या तक्रारींमध्येही पूर्वीपेक्षा अधिक वाढ झाली असून, घाम तसेच उष्मा वाढल्यामुळे या तक्रारी वाढल्याचे दिसून येते. सध्या दिवसभर उष्ण आणि संध्याकाळी तसेच रात्री पुन्हा हवेमध्ये
गारवा जाणवतो. त्याचाही आरोग्यावर परिणाम होताना दिसतो. या प्रकारचे वातावरण हे विषाणू संसर्गासाठी पूरक असते. या बदलामुळे सर्दी, ताप, खोकला या प्रकारच्या साथींचे आजार वाढतात. त्यामुळे या आजारावर वैद्यकीय उपचार घेणार्‍या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते.

वातावरणामध्ये होत असल्यामुळे बदलामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे, पित्त होण्यासह अंगावर पुरळ होण्याच्या तक्रारी वाढत आहे. वदलत्या वातावरणाने लहान मुलांना खोकल्याचा त्रास दीर्घकाळ राहत असल्याने पालकही चिंताग्रस्त झाले आहेत.