रत्नागिरी:- शहरातील बंदररोड येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. ४ मार्च रोजी रात्री १०.१० वा. खासगी रुग्णालयात घडली आहे.
साईनाथ शंकर नेवरेकर (३९, रा. बंदररोड, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रविवार, दि. ३ मार्च रोजी रात्री ९.३० वा. सुमारास त्याला घरी चक्कर आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर साईनाथला सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. घरी सोडण्यात आले होते.
परंतु, रात्री ८.३० वा. सुमारास त्याला पुन्हा चक्कर आल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी साईनाथला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.