देवरुख- संगमेश्वर मार्गावर बस दरीत कोसळून 13 प्रवासी जखमी

संगमेश्वर:- संगमेश्वर कोल्हापूर राज्य मार्गावर देवरुख आगाराची देवरूखहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या बसला लोवले येथे अपघात होऊन बस दरीत कोसळली. या अपघातामध्ये बसमधील 13 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवारी संध्याकाळी 6. 30 वाजण्याच्या दरम्यान घडला.

देवरुखहून संगमेश्वरकडे येणाऱ्या बस क्रमांक (MH- 14- 2432) ही बस घेऊन चालक अमित आपटे हा बस घेऊन संगमेश्वर ला येत होता. बस लोवले येथे आली असता चालक आपटे याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत जाऊन कोसळली

बस मधील साक्षी शंकर लिंगायत (वय 41 रा , तुरळ), सतीश शिवराम करदोडे कोंडअसुर्डे, शेखर सदाशिव चव्हाण संगमेश्वर ज्योतिबा श्रीपती पवार ( 35 वर्षे रा देवरुख,) निवृत्ती रामकृष्ण माने सावर्डे दिलीप बारकू लेवारे, (रा नाशिक) बबन कृष्णा पवार, (फणसवळे, )रुद्र संतोष चव्हाण (12 कोळंबे), अतिक रहमान पटेल , पांडुरंग संसारे दापोली, सिद्धी संदीप घडशी माभळे, शिवानी खातू संगमेश्वर हे जखमी झाले आहेत.