ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग ५ व ६ मध्ये खास कार्यक्रम

उद्योजक सौरभ मलुष्टे मित्रमंडळामार्फत आयोजन

रत्नागिरी:- ना. उदय सामंत यांच्या वाढ दिवसानिमित्त शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मध्ये नागरिक व लहान मुलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता साळवी स्टॉप येथील बाळासाहेब ॲक्टिव्हीटी सेंटर येथे हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. उद्योजक सौरभ मलुष्टे मित्रमंडळ मार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांचा वाढ दिवस २६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. या वाढ दिवसाच्या पार्श्भूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक ५ आणि ६ मधील नागरिकांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २५ डिसेंबरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी व नागरिकांसाठी जादूचे प्रयोग, फनी गेम्स आणि सांता क्लॉज डान्सचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थिती लावावी असे आवाहन करण्यात आले आहे.