राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांची मागणी
रत्नागिरी:-रत्नागिरीतील शासकीय बी फार्मसी महाविद्यालयातील शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरावीत अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
रत्नागिरी मधील शासकीय बी. फार्मसी कॉलेज येथे एकूण 11 शिक्षक हे अभ्यासक्रमाला मंजूर पद असून मागील दोन महिन्यापासून 11 पैकी 3 शिक्षक हे कॉलेज चालवत असल्याचे दिसून येत आहे. उरलेले 8 शिक्षक हे सुमारे दोन महिन्यापासून पद रिक्त आहेत. परिणामी याचा नाहक त्रास हा विद्यार्थी वर्गाला होत आहे. यामुळे येथे शिकणाऱ्या सुमारे 200 विद्यार्थ्यांना प्रचंड समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तीन शिक्षक शिकवण्या घेत आहेत त्यामुळे कॉलेज प्रशासनावरही प्रचंड ताण असलेला निदर्शनास येत आहे. तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन शिक्षक उपलब्ध करून द्यावेत व विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानापासून बचाव करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संकेत कदम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.









