रत्नागिरी:- परतीच्या मार्गावर असलेल्या मोसमी पावसाने गेले काही दिवस उसंत घेतली असताना रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक भागात विजांसह हलका पाऊस झाला. काही भागात जोरदार सरींही झाल्या. पुढील दोन दिवस जिल्ह्यात मळभी वातावरणासह हलक्या पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे काही भागात हलका पाऊस झाल्याने काही प्रमाणात तापमानात उतार आला. मात्र, त्यानंतर मात्र, पावसाने उघडीप दिल्याने तापमानात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव जाणवू लागला. अशातच मळभी वाातरणाने उकाड्यात वाढ झाली. शुक्रवारी सकाळी 10 वाजता रत्नागिरीतीलल अनेक भागात कमाल तापमान 30 ते 33 अंशावर गेले होते. दुपारी तामापनात आणखीन एक ते 2 अंशाने तापामान वर-खाली सरकत होते. शनिवारी देखील हीच परिस्थिती कायम होती. गुरूवारी रात्री झालेल्या पावसाने कमाला तापमानातही उतार झाला होता. दरम्यान, ही वातावरणीय स्थिती दोन दिवस राहणार आहे.