वसई-रत्नागिरी एसटी बसला हातखंबा येथे अपघात

रत्नागिरी:- कोकणात गणेशोत्सवाची धूम सुरु झाली आहे. आजपासून सुरु होणार्‍या गणेशोत्सवासाठी रत्नागिरीत येणार्‍या चाकरमान्यांच्या वसई-रत्नागिरी एसटी बसला हातखंबा नजिक अपघात झाला.चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली कलंडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले.याच दरम्यान महाड येथे दौर्‍यावर निघालेल्या पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्या समक्ष हा अपघात झाला. ना.सामंत यांनी तात्काळ आपला ताफा थांबवून अपघातातील जखमी प्रवाशांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

वसईहून रत्नागिरीला येणार्‍या एसटी बसला सोमवारी सकाळी हातखंबा येथे अपघात झाला. चालकांचे गाडीवर नियंत्रण सुटल्यामुळे गाडी रस्त्याच्या खाली कलंडली. सुदैवाना या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. अपघातची माहिती मिळताच हातखंबा पोलीस वाहतुक मदत केंद्राचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तर ना.सामंत यांच्या ताफ्यातील पोलीस कर्मचार्‍यांनीही जखमी प्रवशांना मदत केली.

पालकमंत्री ना.उदयजी सामंत स्वत: गाडीतुन खाली उतरून त्यांनी स्वत:च्या कोणत्याही सुरक्षेचा विचार न करता मदत कार्याला सुरवात केली. तात्काळ त्यांनी आपल्या सहकार्‍यांना घेवून एसटी बस मध्ये अडकलेल्या २१ लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम केले.ते एवढ्यावर थांबले नाही महाडचा दौरा असताना अपघातात जे जखमी झालेल्या प्रवाशांना त्यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीतुन रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.त्यांनी केलेल्या या मदत कार्याबद्दल एसटी बस मधील त्या सर्व प्रवाशांनी पालकमंत्री ना.उदय सामंत यांचे आभार मानले.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी,कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. अधिक तपास हे.कॉ.उदय वाजे करत आहेत.