चिपळूण:- ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना 30 मे रोजी रामपूर येथे घडली. या प्रकरणी ट्रकचालकावर येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रांत विजय चव्हाण (पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. तसेच अस्मित अनंत चव्हाण (27, मार्गताम्हाने), अक्षता सुमीत साळवी (28, कापसाळ) अशी जखमी झालेल्याची नावे आहेत. विक्रांत चव्हाण हा त्याच्या ताब्यातील ट्रक तन्हाळी ते हेळवाक असा गुहागर-चिपळूण मार्गाने घेऊन जात होता. तो रामपूर घाटातील एका वळणावर आल्यावर त्याने विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन ट्रक रस्त्याविरुध्द बाजूला नेऊन ओव्हरटेक करत असताना समोरुन आलेल्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार अस्मित चव्हाण व त्याची बहीण अक्षता साळवी यांच्या हाता-पायाला तसेच चेहऱ्याला दुखापत झाली. या अपघातप्रकरणी विक्रांत चव्हाणवर गुन्हा दाखल झाला आहे.








