स्व. प्रमोद महाजन मैदानावर सायंकाळी होणार जाहीर सभा
रत्नागिरी:- जिल्ह्यात बारसू रिफायनरीचा विषय चांगलाचा गाजत असताना रत्नागिरीतील पहिल्याच जाहिर सभेसाठी येणारे महाराष्ट्र न
वनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या जाहिर सभेत काय बोलतात याकडे मनसे कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे. बारसू रिफायनरीवर राज ठाकरे काय बोलणार याकडे बारसू ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. आज सायंकाळी 5 वाजत स्व.प्रमोद महाजन क्रिडांगणावर राज ठाकरे यांची जाहिर सभा होणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीतील पहिलीच जाहिर सभा यशस्वी करण्यासाठी मुंबईतील नेते, कार्यकर्त्यांची फौज रत्नागिरीत दाखल झ्ााली आहे. राज ठाकरे यांच्या स्वगतासाठी रत्ननगरी मनसे सैनिकांनी सजवली आहे. शहराच्या प्रवेशद्वारापासून मोठे बॅनर, दुभाजकावरील पोलवर मनसेचे झ्ोंडे फडकविण्यात आले आहे. त्यामुळे शहरात सभेचे वातावरण तयार झ्ााले आहे.
शहरातील प्रमोद महाजन मैदानावर राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्या मैदानावर मोठ्या व्यासपिठासह भव्य स्क्रिन उभारण्यात आल्या आहेत.मैदान मनसे झ्ोंड्यानी सजविण्यात आले आहे. तर नेते कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल मैदानावर आहे.
रत्नागिरीतील पहिल्याच सभेत राज ठाकरे काय बोलतात. याची उत्सुकता सर्वांनाच आहे. एकाबाजूला बारसू रिफायनरीचा मुद्दा राज्यात गाजत आहे. रिफायनरी प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांची नेमकी काय भूमिका घेतात याकडे बारसू ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. बारसू सोबतच अपूर्ण असलेला मुबंई – गोवा महामार्ग, कोकणातील जागा खरेदीसाठी परप्रांतीयांचे आक्रमण, कोकणात आंबा, काजूचे मोठे उत्पादन असून त्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नसणे, येथील पर्यटन विकासाकडे सरकारचे झ्ाालेले दुर्लक्ष यावर राज ठाकरे आपल्या शैलीत काय बोलणार आहेत. याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.