क्रांती नगर येथील अपघातात जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील क्रांतीनगर येथे दुचाकी-ट्रकमध्ये झालेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी रात्री 8 च्या सुमारास घडली होती. संकेत कृष्णा पाटील (32, रा मिरजोळे, पाटीलवाडी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संकेत पाटील हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेवून क्रांतीनगर येथून जात होता. समोरून येणाऱ्या रिक्षामुळे संकेत याने दुचाकी डाव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीची धडक ट्रकच्या मागील चाकाला बसली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या संकेत याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.