नाशिक येथील आंबा महोत्सवात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग

रत्नागिरी:- कोकण पर्यटन विकास संस्थेतर्फे मंगळवारी नाशिक येथील पिनॅकल मॉल, त्र्यंबक नाका येथे आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सावात कोकणातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, केळशी, पावस, गुहागर संगमेश्वर, ठिकाणाहून शेतकरी सहभाग सहभाग घेणार आहेत.

महोत्सवाचे उद्घाटन विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते व महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. यंदाचा महोत्सव हा संस्थेतर्फे आयोजित 16 वा आंबा महोत्सव असून, महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक शेतकर्‍यांचेच स्टॉल या ठिकाणी असतील. यातील आंबा हा केवळ नैसर्गिकरित्या गवतात पिकवलेलाच असेल. याचबरोबर कोकणातील आंबा, काजू, फणस, करवंद, जांभूळ, आवळा या पासून बनविलेला विविध प्रकारचा कोकणमेवा महोत्सवात विक्रीस उपलब्ध आहे. तसेच कोकणातील पर्यटनस्थळांची माहिती दिली जाणार आहे.