रत्नागिरी:- नव्या नळपाणी योजनेची सातत्याने फुटणारी पाईपलाईन, घनकचर्याचा प्रलंबित प्रकल्प, नव्याने होऊ घातलेले काँक्रीटचे रस्ते याविषयावरुन महाविकास आघाडीतील ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी नगर पालिकेवर धडक दिली. सध्याच्या सुरु असलेल्या एकतर्फी कामाकाजावरुन हल्लाबोल करीत नगर पालिका प्रशासक व मुख्याधिकार्यांना जाब विचारला.
महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, राष्ट्रवादीचे नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तुझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष निलेश भोसले, ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहर संघटक व तालुका युवाअधिकारी प्रसाद सावंत, संजू साUवी यांच्यासह माजी नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकार्यांनी सोमवारी सकाळी नगर परिषदेवर अचानक धडक दिली. यावेळी प्रशासक तुषार बाबर यांची भेट घेऊन शहरात सध्या सुरु असलेल्या कामकाजाबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
रत्नागिरी शहरातील काही प्रभागांमध्ये विकास कामे निधी मंजूर होऊन रखडवण्यात आली आहे. विकास कामांना मिळालेली निधीही रद्द झाला आहे. शहरातील माजी नगरसेवक राकेश नागवेकर यांच्या प्रभागात सुमारे २५ लाखाचा रस्ता समुद्रकिनार्यावरुन मंजूर झाला होता. दोन वर्ष हे काम आता करतो असे सांगून अधिकार्यांनी ठेवून दिले. या कामाची निविदा रद्द झाल्यामुळे निधीही परत गेला. कुणाच्या सांगण्यावरुन हे काम रखडवण्यात आले असा प्रश्न यावेळी पदाधिकार्यांनी उपस्थित केला.
नगर पालिकेवर सध्या प्रशासक असूनही सकाळी काही सफाई कामगार हजेरी लावण्यासाठी काही माजी नगरसेवकांच्या घरी जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. आरोग्य विभागाच्या अधिकार्यांना यावेळी मुख्याधिकार्यांसमोरच धारेवर धरण्यात आले. माजी नगरसेवकांच्या घराबाहेरील कचरा वेळेत काढला जातो परंतु काही प्रभागातील रस्त्यावरील कचराच अनेक दिवस काढला जात नसल्याचा आरोप यावेळी माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी यांनी केला.
मिरकरवाडा जेटीजवळील सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह बंद असल्याने, स्थानिक मच्छीमार महिलांसमोर मोठा प्रश्न उभा रहात आहे. गेली सहा महिने पाठपुरावा करुनही त्याकडे नगर पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे माजी नगरसेविका रशिदा गोदड यांनी केला. हे प्रसाधनगृह व शौचालय तातडीने सुरु करण्यात यावे अशी मागणी त्यांनी व पदाधिकार्यांनी केली.
सध्या शहरातील प्रमुख रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी कोट्यावधी रुपये आणण्यात आले आहेत. शहरासाठी ही चांगली गोष्ट आहे. परंतु वर्षभरापूर्वी करण्यात आलेले रस्ते किमान दोन वर्ष करण्यात येऊ नयेत, या निधीमध्ये पंधरा टक्के निधी नगर पालिकेने द्यायचा आहे. त्याऐवजी शीळ धरणावर कोट्यावधीचा निधी खर्च झाल्यास, धरणाची पाण्याची साठवण क्षमता वाढेल त्यामुळे शहराला नियमित पाणीपुरवठा होऊ शकतो अशी भूमिका यावेळी बंड्या साळवी यांनी व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बशीर मुर्तुझा यांनी मुख्याधिकारी बाबर यांना सांगितले की, सर्वच पक्षाच्या माजी नगरसेवकांनी सांगितलेली कामे झाली पाहिजेत. प्रत्येकजण वैयक्तिक कामे घेऊन येत नाहीत, नागरिकांचेच प्रश्न सोडवण्यासाठी येत असतात. त्यामुळे सर्वांकडेच नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी लक्ष द्यावे, कर्मचार्यांनी दबाव झुगारुन काम करावे अशी मागणीही मुर्तुझा यांनी यावेळी केली. महाविकास आघाडीकडून सूचवलेल्या कामांकडे दुर्लक्ष झाल्यास नगर पालिका व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढावा लागेल असा इशाराही मुर्तुझा यांनी दिला.
यावेळी ठाकरे गटाचे युवा पदाधिकारी दुर्गेश साळवी, महिला मनिषा बामणे, निखिल बने आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविकास आघाडी लढण्याच्या तयारीत
ठाकरे गटाचे उपनेते व आमदार राजन साUवी यांच्या उपस्थितीमध्ये हा@टेल व्यंकटेश याठिकाणी ठाकरे गट व राष्ट्रवादी आणि काँगÏेसच्या पदाधिकार्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील प्रश्न आणि विकास कामांबाबत निर्माण झालेल्या अडचणीसंदर्भात यापुढे एकत्रित लढा उभारायचा निर्णय घेण्यात आला. त्याचा प्रत्यय दोन दिवसातच आला. महाविकास आघाडीच्या पदाधिर्काघ्यांनी न.प.वर धडक देत भोंगU कारभाराबाबत जाब विचारला.