रत्नागिरी:- उन्हाळी हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होणारी गर्दी लक्षात घेऊन नियमित गाड्यांबरोबर या आधीच काही समर स्पेशल गाड्या जाहीर केलेल्या असताना त्यामध्ये आता आणखीन दोन गाड्यांची भर पडली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जाहीर करण्यात आलेल्या नव्या समर स्पेशल गाड्यांमध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ एप्रिल ते ३ जून २०२३ या कालावधीत दर शनिवारी सोडण्यात येणार आहे. त्या दिवशी ही गाडी रात्री एक वाजून दहा मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी ती गोव्यात कर्मळीला दोन वाजून ३५ मिनिटांनी पोहोचेल. करमाळी येथे लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर धावताना ही गाडी त्याच दिवशी सायंकाळी चार वाजून वीस मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम स्थानकांवर थांबेल. दुसरी समर स्पेशल विशेष गाडी पुणे ते एर्नाकुलम दरम्यान सुपरफास्ट म्हणून धावणार आहे. ही गाडी १३ एप्रिल ते २५ मे २०२३ या कालावधीत आठवड्यातून एकदा धावणार आहे. या कालावधीत पुणे येथून ही गाडी दर गुरुवारी सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ती सायंकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी एर्नाकुलमला पोहोचेल. तिचा परतीचा प्रवास शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल. ही गाडी लोणावळा, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरु जंक्शन, कासरगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोडे, तिरूर, शोरनूर जंक्शन आणित्रिसूर या स्टेशनवर थांबणार आहे.