साडेसहा लाखांच्या फसवणूक प्रकरणात भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांवर गुन्हा

खेड:- जमिनीचे काम करून देण्याचे आमिष दाखवत तालुक्यातील चिंचघर- वेताळवाडी येथील एकाकडून ६ लाख ५० हजारांची स्वीकारल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालयातील एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२१ ते जानेवारी . २०२३ या कालावधीत घडल्याचे – तक्रारीत नमूद केले आहे.

शिवानंद टोपे, सायली धोत्रे अशी संशयित अधिकारी व कर्मचाऱ्याचे नाव आहे. जमिनीचे काम करून देण्याच्या आमिषापोटी दोघांनी फिर्यादीकडून वेळोवेळी हस्ते, परहस्ते, ऑनलाईन व घरी अशी ६ लाख ५० हजारांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न केल्यास जमिनीच्या कामावर परिणाम होईल, अशी ताकीदही उपअधीक्षक शिवानंद टोपे यांनी दिली होती. या दोघांनी स्वतः, तर कधी हस्तकाद्वारे ६ लाख ५० हजार स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार ५ एप्रिल रोजी दोघांवर गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणाला अटक झालेली नाही.