जिल्ह्यात नव्याने 8 कोरोना बाधित

रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. जिल्ह्यात काल गुरुवारी कोरोनाचे 8 रुग्ण सापडले. एकूण रुग्णांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे. 21 रुग्ण हे गृहविलगीकरणात असून 4 रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच जिल्हा टास्क फोर्सची बैठकही पार पडली. रुग्णांची संख्या वाढल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.