आरटीओ कार्यालयाकडून नव्या वाहन सिरीजची घोषणा

रत्नागिरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी कार्यालयाची दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका 20 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. ज्या वाहनधारकांना आकर्षक क्रमांक आगाऊ आरक्षित करावयाचा आहे, त्यांनी त्या वाहन क्रमांकासाठी असलेल्या विहीत शुल्काच्या रकमेचा धनाकर्ष 20 मार्च रोजी सकाळी 8.45 ते दुपारी 2 वाजेपर्यंत कार्यालयात खिडकी क्र. 1 (खासगी वाहन विभाग) यांच्याकडे सादर करावा.

धनाकर्ष विशेषतः राष्ट्रीयकृत बँकेचा असावा. धनाकर्ष ऊध ठढज ठ-ढछ-ॠखठख यांच्या नावाचा असावा. एखाद्या आकर्षक क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जदारांची यादी त्याच दिवशी दुपारी 2 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर लावली जाईल. एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकासाठी जादा शुल्काचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात 21 मार्च रोजी खिडकी क्र. 1 (खासगी वाहन विभाग) यांच्याकडे दुपारी 12 वाजेपर्यंत सादर करावा. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेल्या क्रमांकाचा लिलाव उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, रत्नागिरी यांच्या दालनात 21 मार्च रोजी दुपारी 2 वाजता होईल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी जयंत रमेश चव्हाण यांनी कळविले आहे.