रत्नागिरी:- होळी सणासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने आणखी १२ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-पनवेल ते सांवतवाडी, रत्नागिरी दरम्यान या गाड्या धावणार आहेत.
०११५१ स्पेशल ट्रेन सीएसएमटी स्थानकातून ४ आणि ७ मार्च रोजी रात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सुटून सकाळी ९ वाजता रत्नागिरीला पोहोचेल. (Holi Special Train) परतीसाठी ०११५२ ट्रेन रत्नागिरीहून ६ मार्चला सकाळी साडेसहा वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी सीएसएमटीला येईल. या ट्रेनला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकात थांबा दिला आहे. ०११५३ विशेष गाडी ५ आणि ८ मार्च रोजी पनवेलहून संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटून रत्नागिरीला रात्री १२ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीसाठी ०११५४ ट्रेन रत्नागिरीहून ७ मार्च रोजी सकाळी १० वाजता सुटून त्याचदिवशी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पनवेलला पोहोचेल. या ट्रेनला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकात थांबा दिला आहे.
०११५५ ट्रेन पनवेलहून ४ आणि ७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून १० मिनिटांनी सावंतवाडी रोडला पोहोचेल. (Holi Special Train) परतीकरिता ०११५६ ट्रेन सावंतवाडीहून ५ आणि ८ मार्चला सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी सुटून त्याचदिवशी दुपारी ५ वाजून २० मिनिटांनी पनवेलला पोहोचणार आहे. या गाडीला रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकात थांबा आहे.









