मनरेगा अंतर्गत जिल्ह्यात साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड

रत्नागिरी:- महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (मनरेगा ) यंदा आतापर्यंत साडेआठ हजार हेक्टर क्षेेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. कोकणात या योजनेत 14 हजार हेक्टर क्षेेत्रावर लागवडीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी 60 टक्के लागवड पूर्ण करण्यात आली असून उर्वरित 40 टक्के क्षेेत्र लागवडीखाली आणण्यासाठी किनारपट्टी भाग अग्रणी असून, यासाठी प्रशासनासह कृषी विभागाने कंबर कसली आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत कोकणासाठी लागवड अनुदानाबाबत नव्याने आकृतिबंधाला लवकर मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा फळबाग लागवडीबाबत उशीर होत असल्याने लागवड क्षेत्र कमी होण्याचा अंदाज होता. मात्र, लागवडीचा वेग पाहता यंदा गतवर्षापक्षा अधिक लागवड होण्याचा अंदाज आहे.

गेल्या काही वर्षांपासून ‘मनरेगा’ फळबाग लागवडीला प्राधा देण्यात आले आहे. यंदा सुमारे 14 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे कृषी विभागाने उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी कृषी सहाय्यकांवर जबाबदारी दिली. फळबाग लागवडीसाठी नव्याने दरांबाबतच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याला उशीर झाला. त्यामुळे लागवडीचा वेग कमी राहण्याची शक्यता होती. मात्र आक्टोबरपासून फळबाग वडील वेग आला.
या योजनेत सर्वाधिक लागवड पालघर जिल्ह्यात झाली आहे. पालघरने यामध्ये 100 टक्के उद्दिष्टपूर्ती केली आहे तर रत्नागिरी जिल्हा या योजनेत पिछाडीवर असला तरी लागवडीसाठी अनुकुल ठरला आहे. ठाणे जिल्ह्यात 70 तर रायगडने या योजनेत 80 टक्क्यापंर्यंत मजल मारली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने या यो जनेत 55 टक्के उद्दिष्ट लागवड पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेत एकूण 14 हजार 180 हेेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या पैकी 8 हजार 445 हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली आहे. यामध्ये प्राधान्याने आंबा, काजूच्या लागवडीला प्राधान्य देण्यात आले आहेे.