भगवती बंदर येथे खलाशाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- भगवती बंदर येथील समुद्रात मच्छीमारी बोटीवरील वृद्ध खलाशाचा अचानकपणे उलटी येऊन मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी घडली . व्दारिका लालबहाद्दूर थारु ( ६६ , मूळ रा . नेपाळ सध्या रा . मिरकरवाडा जेटी , रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या खलाशाचे नाव आहे . या बाबत बोट मालकाने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली . त्यानूसार , त्यांच्या मालकीच्या नुरमोहम्मद ३ नावाच्या बोटीवर द्वारिका खलाशी म्हणून कामाला होता . रविवारी सायंकाळी ६.३० वा. बोट मच्छिमारीसाठी लाईट हाउस समोर ३० वाव खोल समुद्रात गेली होती . सोमवारी पहाटे ४ वाजता रापण मारत असताना व्दारिका थारुला अचानकपणे उलटी आल्याने त्याला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले . तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी थारुला तपासून मृत घोषित केले . याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.