रत्नागिरी:- देशासाठी आणि भूमिपुत्रांसाठी पतितपावन मंदिर बांधणाऱ्या रत्नागिरीचे सुपुत्र भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनीच सुरु केलेल्या आणि कालांतराने बंद पडलेल्या सहभोजन आणि सहभजनाचा ऐतिहासिक सोहळा काल दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पतित पावन मंदिरामध्ये साजरा झाला.
सहभोजानामध्ये रत्नागिरीतील नागरिक सहभागी झाले होते. दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या निधनानंतर पतितपावन मंदीरातील बंद पडलेला सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम अखिलभारतीय भंडारी समाज महासंघ, पतीतपावन मंदीर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ यांच्या माध्यमातुन आज पार पडला. सकाळी दरवर्षी प्रमाणे शहरातून मोटार रॅली काढण्यात आली. त्यानंतर ऐतिहासिक पतित पावन मंदिरामध्ये या उपक्रमात ज्यांचे महत्वाचे योगदान लाभले अशांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दानशूर भागोजी शेठ कीर, स्वा. सावरकर आणि भागोजीशेठ कीर ज्यांना आध्यात्मिक गुरू मानत त्या संत गाडगेबाबा याचे रूप धारण केलेल्या नागरिकांची पाद्यपूजा आणि औक्षण करण्यात आले. या तिघांच्या हस्ते मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर सह्भोजानाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात रत्नागिरीकर उपस्थित होते. तर मंदिरात भजनाचा उपक्रम सुरु होता. अनेक भजन मंडळानी मंदिरात भजने सदर केली.
यावेळी पतितपावन ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, अॅड. बाबासाहेब परुळेकर, नवीनचंद्र बांदिवडेकर, माजी आमदार बाळ माने, भंडारी समाजाचे अध्यक्ष रुपेंद्र शिवलकर, राजीव कीर, नितीन तळेकर, मंदार खेडेकर, बाबा नागवेकर, संपदा तळेकर, पल्लवी पाटील, सुश्मिता सुर्वे, जयेश गुरव, सौ दया चवंडे, सौ. मनिषा बामणे, दिलीप मयेकर, विनोद वायंगणकर, बंटी कीर, राजन शेट्ये, कृष्णकांत नांदगावकर, सुरेंद्र घुडे, अनिकेत कोळंबेकर, अजिंक्य डोंगरे, मुकुंद विलणकर, रोहीत पवार, सौ. रीमा पवार, सौ प्राजक्ता उभारे, सुषमा तांबे, दिपक गोवेकर, सागर सुर्वे, अमित विलणकर, सत्यवान बोरकर यांच्यासहीत अनेक कार्यकर्ते बंधु भगिनी उपस्थित होते.