28 फेब्रुवारी 2023 ला रंगणार पर्यावरण बालनाट्य स्पर्धा

रत्नागिरी:-/दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी इको फोक्स व्हेंचर्स मुंबई व प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय माध्यमिक पर्यावरण बालनाट्य स्पर्धा स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रंगणार आहे.

पर्यावरण नाट्य महोत्सवाचे हे बारावे वर्ष असून विद्यार्थी दशेतच मुलांमध्ये पर्यावरण रक्षणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी. अंगभूत अभिनय कलेला योग्य दिशा मिळावी या उद्देशाने हा महोत्सव आयोजित केला जातो. माध्यमिक शाळांना तसेच शिक्षकांना पर्यावरणावर लेखन दिग्दर्शनास प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून यावर्षी लेखन ,दिग्दर्शन , सांघिक सर्वोत्कृष्ट बालनाट्य ,अभिनय या करीता रोख पारितोषिके, प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे .या पर्यावरण बालनाट्याचा विषय कांदळवन संवर्धन आणि संरक्षण असा आहे. या स्पर्धेसाठी पुढील प्रमाणे नियमावली ठरवण्यात आली आहे.1) बालनाट्य सादरीकरण कमीत कमी वेळ बारा मिनिटे व जास्तीत जास्त वीस मिनिटे असेल.2) सदर बालनाट्य स्पर्धा माध्यमिक शाळांसाठी असेल.३) फक्त शालेय संघांना प्रवेश दिला जाईल.४) सहभागी कलाकारांचे ओळखपत्र आवश्यक आहे.५) लेखन व दिग्दर्शन ज्या त्या शाळेतील शिक्षक असावेत.६) नाट्यसंहितेसाठी लेखक परवानगी असणे आवश्यक आहे.७) प्रकाश योजनेकरता जनरल व चार स्पॉट देण्यात येतील यापेक्षा जास्त स्पॉट वापरायचे नाहीत.८) परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.९)  महोत्सवात ऐनवेळी बदल करण्याचा तसेच उपक्रम रद्द करण्याचा हक्क संयोजकांनी राखून ठेवला आहे.
तरी बहुसंख्य माध्यमिक शाळांच्या स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी असे इको फोक्स व्हेंचर्स व प्रतिज्ञा नाट्यरंग कोल्हापूर संस्थेमार्फत आव्हान करण्यात येत आहे. स्पर्धे संदर्भात अधिक माहितीसाठी नाट्यकर्मी श्री. गणेश राऊत यांच्याशी संपर्क साधावा.