रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळावर पुढील पंधरा दिवसात नाईट लँडिंगची सुविधा उभारली जाणार आहे. हे विमानतळ सुरु झाले की आपसुकच उद्योजक येतील, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले, येथील विमानतळावर ८० सीटर विमान उतरवण्यासाठी पुरक धावपट्टी उभारण्यात आली आहे. उद्योजकांना हे सोयीचे ठरणार असून भविष्यात त्याचा फायदा होईल. रात्रीच्यावेळी या विमान उतरण्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहे. १०० मीटरची कंपाऊडवॉल उभारण्यासाठी निधी मंजूर झाला असून टर्मिनल इमारतीसाठीही २१ कोटी रुपये मिळालेले आहेत. यासाठी भुसंपादन करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाकडून सुरु आहे. मागील अडीच वर्षे ही प्रक्रिया रखडलेली होती. विद्यमान जिल्हाधिकार्यांनी दोन महिन्यात ती पुर्ण केली. तसेच जागेपोटी प्राप्त झालेल्या ६० कोटी रुपयांपैकी ४७ कोटी रुपये संबंधित जमीन मालकांच्या बँक खात्यात जमा झालेेले आहेत. दहा लाखापासून एक कोटी रुपयांची रक्कम जागेपोटी तेथील लोकांना मंजुर झालेली आहे. भुसंपादनामुळे विमानतळाचा प्रश्न लवकरच सुटणार आहे.
हार्ट अटॅकचे प्रमाण दुप्पट: सामंत
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मृत पावलेल्या गुहागर येथील त्या कर्मचार्याचा मृत्यू हार्ट अटॅक आल्यामुळे झाला आहे. ते कामानिमित्त संबंधित कार्यालयात आले होते असे मंत्री सामंत यांनी सांगितले. ते म्हणाले, देशामध्ये हार्ट अटॅकमुळे मृत पावणार्यांचे प्रमाण तिन वर्षात दुप्पट झाले आहे. यामध्ये ३५ ते ४५ वयोगटातील लोकांचा टक्का अधिक आहे. यावर संशोधन करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहीजे. गेल्या काही दिवसात राज्य शासनाने रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलली आहेत. विविध खात्यांमधील 75 हजार पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्मचार्यांवरील अतिरिक्त कामाचा भार कमी होईल.