रत्नागिरी:- फणसोप येथील मनोरुग्ण महिलेने तेथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शनिवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.20 ते सायंकाळी 5 वा. कालावधीत घडली आहे.
विनया विजय भारती (40,रा.फणसोप जुईवाडी, रत्नागिरी ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.त्या 2018 पासून मानसिक रुग्ण असून त्यांच्यावर प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी येथे उपचार सुरु होते. शनिवारी वेडसरपणातूनच त्यांनी फणसोप जुईवाडी चिमट्याची खोंड येथे बांधकाम सुरु असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.ही बाब त्यांच्या नातेवाईकांना समजताच त्यांना पाण्याबाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.









