रत्नागिरी:- तालुक्यातील डोर्ले येथे 27 जानेवारी रोजी दुपारी 12.10 वाजता अपघात झाला होता या अपघातात संतोष देऊ घवाळी (47 डोर्ले, रत्नागिरी) हे जखमी झाले होते. त्यांना प्रथम रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या आकस्मिक मृत्यूची नोंद पूर्णगड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.









