आरेवारे येथे दोन दुचाकीमध्ये अपघात; दोघे जखमी

रत्नागिरी:- रत्नागिरी ते गणपतीपुळे येथील आरेवारे रस्त्यावर अज्ञात चालकाने हुल दिल्याने दोन दुचाकीमध्ये अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या दोन तरुणांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   ही घटना सोमवार 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली.

ओमकार प्रदिप भाटकर (२८, रा. बसणी, रत्नागिरी ) व प्रितेश प्रताप सुर्वे (३३, रा. नेवरे, ता. रत्नागिरी) अशी जखमींची नावे आहेत. हे दोघेही दुचाकीस्वार रत्नागिरीकडे येत असताना अज्ञात वाहनाने त्यांना हुल दिली. त्यामुळे  एकमेकांच्या दुचाकीवर आपटून हा अपघात झाला.त्यात जखमी झाल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरु होती.