रत्नागिरी:- हातखंबा येथे सलग दुसरा अपघात झाला आहे. दुसरा अपघात देखील ट्रकचा झाला आहे. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट तीनशे फूट दरीत कोसळला. चालकाने ट्रक मधून उडी मारत आपला जीव वाचवला.
हातखंबा गावातील दर्ग्या जवळ सोमवारी सकाळी दोन ट्रकची धडक झाली व त्यानंतर ट्रकला आग लागली. ही घटना ताजी असतानाच हातखंबा जवळच असणाऱ्या बावनदी घाटात एक ट्रक तीनशे फूट खोल दरीत कोसळला आहे. लोखंडी सळया वाहतूक करणारा हा ट्रक आहे. ट्रकवरील ताबा सुटतात चालकाने ट्रकमधून उडी मारल्याने त्याचे प्राण वाचले आहेत.









