रत्नागिरी:- शासकीय आधारभूत धान खरेदी योजना हंगाम 2022-23 मध्ये जिल्ह्यात शासनाच्यावतीने मुख्य अभिकर्ता म्हणून दि. महाराष्ट्र राज्य सहकार पणन महासंघ मुंबई, जिल्हा पणन कार्यालय यांच्या वतीने जिल्हयात 15 धान खरेदी केंद्रावर धानाची खरेदी करण्यात येते. शासनाने धान खरेदी साठी 30 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणीसाठी मुदत देण्यात आलेली होती. मात्र आता 7 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शेतकर्यांनी धान पीकाची हंगाम 2022-23 ची (भाताची) नोंद असलेला सातबारा उतारा, आधार कार्ड, अद्यावत बँक पासबूक इत्यादी कागदपत्र घेऊन नोंदणी करावी असे जिल्हाधिकारी रत्नागिरी एम. देवेंदर सिंह यांनी आवाहन केले आहे. तसेच सातबारा, 8 अ उतार्यासोबत नोंदणी करताना शेतकर्याचा लाईव्ह फोटो संगणक प्रणालीवर अपलोड करण्यात यावा. जिल्ह्यात खेड तालुका सह.ख.वि.संघ.लि. खरेदी केंद्राचे ठिकाण खेड, दापोली तालुका केळशी परिसर अंबा उत्पा. सह. मर्या. खरेदी केंद्राचे ठिकाण केळशी, दापोली ता.सह.ख.वि.संघ.लि. खरेदी केंद्राचे ठिकाण दापोली, गुहागर ता.सह.ख.वि.संघ.लि. खरेदी केंद्राचे ठिकाण गुहागर, चिपळूण ता.सह.ख. विक्री संघ, चिपळूण खरेदी केंद्राचे ठिकाण चिपळूण, मिरवणे, आकले. शिरळ विविध कार्य सेवा. सोसायटी शिरळ भागाडी खरेदी केंद्राचे ठिकाण शिरळ भागाडी, शिरगांव गट विविध कार्य सेवा. सोसायटी शिरगांव खरेदी केंद्राचे ठिकाण शिरगाव, रत्नागिरी जिल्हा कृषि औ. सर्व सेवा संघ. लि. रत्नागिरी खरेदी केंद्राचे ठिकाण झाडगाव नाका, संगमेश्वर, लांजा तालुका सह.ख. विक्री संघ लि. लांजा खरेदी केंद्राचे ठिकाण लांजा, राजापूर तालूका सह. खरेदी विक्री संघ.लि. राजापूर खरेदी केंद्राचे ठिकाण राजापूर,पाचल. संगमेश्वर तालुका देवरुख ग्रुप विविध कार्य. सहकार सेवा सोसायटी मर्या. देवरुख या ठिकाणी नोंदणी करण्यात येत आहे.