धक्कादायक! जेवण चांगले झाले नाही म्हणून नाचणेतील तरुणीने घेतला गळफास

रत्नागिरी:- जिल्ह्यात आत्महत्यांचे प्रमाण वाढत असताना बुधवारी एका विचित्र कारणातून तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. जेवण चांगले झाले नाही यावरून नातेवाईकांशी वाद घालत तरुणीने बेडरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत शहर पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

रत्नागिरी शहरातील नाचणे येथील सौभाग्य नगर येथील स्वरूप अपार्टमेंट येथे तरुणी वास्तव्याला होती. तरुणीने अजब कारणावरून आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जेवण पसंत पडले नाही म्हणून तरुणीने रागाच्या भरात घरातील बेडरूम मध्ये जाऊन फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव समोर आलेले नाही. मुलीच्या आईने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. शहर पोलिसांकडून स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.