वाटद जिल्हा परिषद गट भाजपकडून उद्योगमंत्री उदय सामंत यांचे जंगी स्वागत

रत्नागिरी:- राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत शनिवारी वाटद जिल्हा परिषद गटाच्या दौऱ्यावर असताना भाजपच्या वाटद जिल्हा परिषद गटाकडून ना. सामंत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी नांदिवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक सुर्वे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ना. उदय सामंत शुक्रवार पासून रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी जनता दरबार झाल्यानंतर शनिवारी सकाळी ना. सामंत यांच्या वाटद जिल्हा परिषदेचा दौरा सुरू झाला. शनिवारी सकाळी ना. सामंत खंडाळा येथे दाखल झाले. वाटद जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आलेल्या ना. सामंत यांचे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. यावेळी वरवडे, वाटद, चाफेरी, नांदीवडे, सत्कोंडी, लावगण आदी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नांदीवडे ग्रामपंचायत उपसरपंच विवेक सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रमुख नेत्यांनी ना. सामंत यांचे स्वागत केले. वाटद दौऱ्यावर आलेल्या ना.समांत यांनी जिल्हा परिषद गटातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. ना. सामंत यांच्या या दौऱ्यात भाजप पदाधिकारी देखील सहभागी झाले.
राज्यात असलेल्या युतीप्रमाणे स्थानिक पातळीवर देखील वाटद जिल्हा परिषद गटात सहकार्य राहील अशी प्राथमिक चर्चा यावेळी करण्यात आली.