दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे दुचाकि चालवून समोरुन येणार्‍या दुचाकिला धडक देत त्यावरील चालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तरुणाविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना रविवार 23 ऑक्टोबर रोजी रात्री 8:45 वा. फिनोलेक्स फाटा येथे घडली होती.

बासित अब्दलु रहीम भटटीवाले (24, रा.गावखडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकि चालकाचे नाव आहे.तर या अपघातात स्मितेश दिलीप जोशी (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तसेच त्याच्या दुचाकिवर मागे बसलेला त्याचा मित्र प्रसाद सुनिल राउळ (25, रा.सावंतवाडी, सिंधुदुर्ग) हा गंभिर जखमी झाला होता.रविवारी रात्री प्रसाद आणि स्मितेश सुझूकी अ‍ॅक्सेस (एमएच- 08-वाय- 1369) वरुन कशेळी ते रत्नागिरी असे येत होते.त्याच सुमारास बासिक आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच- 08-एएच- 4079) वरुन रत्नागिरी ते गावखडी असा जात होता.ही दोन्ही वाहने फिनोलेक्स फाटा येथे आली असता बासिकने त्याच्या पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना स्मितेशच्या दुचाकिला धडक देत अपघात केला. यात स्मितेशचा जागीच मृत्यू झाला होता.याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करत आहेत.