चिपळुणात दोन दुचाकींचे समोरासमोर धडक; एकजण ठार

चिपळूण:- कावीळ तळी चिपळूण कराड मार्गावर दोन दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला. 27 जुलै रोजी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जब्बार इब्राहिम लगेवाले (47, चिपळूण) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याबाबतची खबर मोहम्मद वसीम अब्दुल रज्जाक दळवी (30, खेंड चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कावीळतळी येथे जब्बार लगेवाले जात असताना समोरून येणाऱ्या विराज खेरटकर (खेर्डी, चिपळूण) याने जोरदार धडक दिली. या अपघातात जब्बार लगे वाले यांना गंभीर दुखापत झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तर विराज खेरटकर, आयान फवारे हे दोघे जखमी झाले होते.

मोहम्मद रज्जाक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुचाकीवरील वीराज खेरटकर याच्यावर एकाच्या मृत्यूस कारणीभूत तसेच दोघांच्या दुखापतीस व दुचाकी जनुकानेच कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.