हर घर तिरंगासाठी 5 लाख 29 हजार तिरंगा झेंड्यांची मागणी: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहे. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची भावना चेतविण्यासाठी हर घर तिरंगा अभियान राबविले जात आहे. १३ ते १५ ऑगस्ट या दरम्यान हे अभियान राबविले जाणार आहे. त्यासाठी ४ लाख २९ हजार तिरंगा झेंड्याची मागणी केली आहे. शहरात जिल्हा परिषद, पालिका, पोस्ट कार्यालय आदी ठिकाणी ते उपलब्ध होणार आहेत. घरावर सरळ आणि सर्वोच्च स्थानावर तिरंगा फडके  अशा ठिकाणी लावा. त्याचा अवमान होऊन देऊ नका, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ बी. एन. पाटील यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग, मुख्य कार्यकारी अधिकारी इदुराणी जाखड उपस्थित होत्या. हर घर तिरंगा चित्रफितीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्री. पाटील म्हणाले, देशभरात स्वतंत्र्याचा महोत्सव साजरा करून देशभक्तीची भावान प्रत्येकाच्या मनात जागृत करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम
राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार कुटुंबे आहेत. या सर्व घरावर तिरंगा माने डौलेल, अशा प्रकारचे नियोजन केले आहे. त्यासाठी ३/२ चा तिरंगा २५ रुपयाला उपलब्ध होणार आहे. शहरी भागात जिल्हा परिषद, पालिका, पोस्ट ऑफिस, काही स्वयंसवी संस्थाकडे  कापडी झेंडे मिळणार आहेत. प्रत्येकाने स्वखर्चाने हा खरेदी करायचा आहे. तर ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जिल्हा
परिषदेमार्फत झेंडे पुरविले जाणार आहेत. तेथून ग्रामस्थांनी खरेदी करायचे आहेत. तिरंगा फडकवताना नारंगी रंग वरती असायला हवा. सर्वेच्च स्थानवर तो सरळ रेषेत फडकवा. १३ ते १५ पर्यंत तो उतरविण्याची आवश्यकता नाही. मात्र शासकीय कार्यालयात ते उतरविले जातील. प्लास्टिकचा, चुरगळलेला किंवा फाटलेला ध्वज फडकवु नये. १५ ऑगस्टनंतर तो उतरवून घरी ठेवावा किंवा काही एजन्सींद्वारे तो परत घेतला जाणार आहे. जनमंच संस्थेच्या पुढाकाराने जिल्ह्यातील २८ संस्था जिल्ह्यात जनजागृती करीत आहेत.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिक्षण विभागाकडुन विविध वक्तृत्वस्पर्धा आयोजित केल्या आहेत. गावा-गावात दवंडी दिली जाणार आहे. मॅरेथॉन स्पर्धा, सायकल स्पर्धेचेही आयोजन केले आहे. शासकीय कार्यालये देखील सुशोभित करू करण्यात येणार आहेत. रांगोळी काढण्या येणार आहे. शासकीय वास्तुंवरही तिरंगा फडकणार आहेत. शहरातील चौकात रोषनाईने केली जाणार आहे. स्वतंत्र्यविरांच्या घरी भेटी दिल्या जाणार आहेत. प्रत्येक अधिकारी शाळांना भेट देऊन स्वतंत्र्याचे महत्व मुलांना पटवुन दिले जाणार आहे, असे तिन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले.