राजापूर येथील अर्जुना नदीत बुडून प्रौढाचा मृत्यू

राजापूर:- राजापूरात अर्जुना नदीत बुडून प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रघुनाथ पुरुषोत्तम तायशेट्ये ( ५९ ) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. शनिवारी सकाळी अर्जुना नदीपात्रात बंदर धक्का येथे त्यांचा मृतदेह आढळून आला.

रघुनाथ तायशेट्ये हे शुक्रवारी दुपारी घरातून बाहेर पडल्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी राजापूर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली होती . त्यांचा शोध सुरू असता शनिवारी सकाळी त्यांचा मृतदेह नदीपात्रात तरंगताना आढळला. त्यानंतर या बाबतची माहिती राजापूर पोलिसात देण्यात आली. दुपारी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी राजापूर पोलीस अधिक तपास करत आहेत.