रत्नागिरी:- राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांची निवडणूक विभाग व निर्वाचक गणांची प्रारुप प्रभाग रचना २ जून २०२२ रोजी जाहीर केली आहे.
ती यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालय, सर्व तहसीलदार कार्यालय आणि सर्व पंचायत समिती यांच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी कळविले आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार ६२ गट आणि १२४ गण झाले आहेत. अनेक गटांची रचना बदलली असून त्यासंदर्भात इच्छुक उमेदवारांना आपली दिशा ठरवता येणार आहे.