रत्नागिरी:- पोलीस दलात तब्बल तीस वर्षाहून अधिक काळ सेवा बजावणार्या जिल्ह्यातील २८ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांना पोलीस उपनिरिक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकांचे अधिकारी होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे. तर जिल्ह्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये अधिकाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये रत्नागिरी शहर पोलीस स्थानकातील भगवान पाटील, शालन शिंगाडे, लक्ष्मण इंधन यांचा समावेश आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलीस दलात शिपाई म्हणून सेवेत येणार्या कर्मचाऱ्यांना आता थेट हवालदारपदी बढती मिळणार आहे. नाईक संवर्गातील कर्मचार्यांना बढती देण्यापुर्वी सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना बढती देण्याचे आदेश देण्यात आले होते.पोलीस दलात ३० वर्ष सेवा तसेच सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक म्हणून तीन वर्ष सेवा बाजावलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील २८ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आनंदराव पवार(गुहागर), यशवंत बोडकर(कशेडी), रविंद्र तारये (मुख्यालय), लक्ष्मण इंधन( रत्नागिरी शहर), शांताराम वाघ, धर्मराज चव्हाण, नामदेव उंडे(मुख्यालय), जितेंद्र घाणेकर (खेड), दिपक साळवी( ग्रामीण), प्रदिप सुपल, संतोष पवार, संभाजी जाधव( मुख्यालय), मुकुंद देसाई ( ग्रामीण), जगदिश करगुटकर (मुख्यालय), राजेंद्र देसाई( लांजा), जयवंत सोनावळे ( दापोली), दत्ता पवार (बाणकोट), अविनाश पवार( देवरुख), संगम कांबळे (मुख्यालय), रमेश जानवलकर( सावर्डे), दत्ताराम आखाडे(मोपवि), रघुनाथ मोंडूला( ग्रामीण), अनंता बसवंत(मुख्यालय), नाना शिवगण( सुरक्षा), धोंडू गोरे (दापोली), सुरेश खरात (अलोरे), भगवान पाटील, शालन शिंगाडे ( रत्नागिरी शहर) या पोलीसांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २८ सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक यांच्या बढतीचे आदेश दि. ३० मे रोजी पोलीस अधिक्षकांनी दिले आहे.









